Essays by Elias Machado

‘ ओळखलंत का सर मला? ‘ कुसूमाग्रजांच्या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती त्यादिवशी कानावर पडल्या आणि सुचल्या काही ओळी…

ओळखीला गा बय माला?

ओळखीला गा बय माला?
खाट्याॉर अनवॉ रॅऑन विसारतोतॉ तॉ माला

माई नंदार आतॅ सलॅ नाय
मॅरॅदारॅ का सललॅ ता आतॅ कळॅ नाय
कुणॅतरी आहरी हाडॉन मा डॉळ्याला लावीली
त्या गदाळ आहरीतनॅस मॅ नंदार टाकीली
ओळखीला गा बय माला?
माकुन एकदा तॅनॅ विसारला मालाआतॅ मॅ यॅला का हांगॉ
त्या रिकाम्या हातातनॅ मॅ का मांगॉ
नव मयनॅ तुला पॉटात वाडविला
कही मॅ तुला बाह्याशी
हांज हाकाळ तुई  वाट बगीत
मॅस ना हुतारात ब्याह्याशी
हींदाळ्यात  तुला गावीता गावीता
तु मास वॅंग्यात निज्यासॉ
आन मांडूल्यामिनॅ तूला निजविताना
तू मांडूल्याहॅगाट भिज्यासाॉ
तू भिजविलेल्या त्या मांडूल्याव वास
अजून मॅ बाहाल नाय
आन् तुवा कद्याट्ठ्या घुंगरीऑ आवाज
जॉहोत्शे तॉहॉ अजून मा कानात हाय ओळखीला गा बय माला?
माकुन तॉ मा खाट्यॉर अनवॉ रॅलतॉ…मिठ्या पाण्यायो पट्ट्यो करॉन करॉन
कोड्यो राती काडल्यो
रातसा तुवा अुह्या पायतारा बॅहॉन
डॉळ्यायो वाती केल्योआरॅ गाय तीआ वाहराला
नुसत्या वासोरनॅ ओळखातॅ
आन् बय तीया लॅकराला
दा कोसोरनॅ ऑळखातॅ
कोडे वहरे निंगॉन गेले
तुला अडनॅ निंगॉन गॅल्याला
मॅ तुला कत्तॅस बाहाली नाय
माई यॅद कतॅ आलीस नाय तुला
पान बरा जाला आज तू आलॉ
माव जीव जरा मॉकळॉ जालॉ
तू ऑबड्या खेप्योर मादरी पॉसलॉ
पान पॉरा मावॉ आतॅ निंग्यासॉ ओखत जालॉ ओळखीला गा बय माला?
माकुन तॉ अनवॉ रॅलतॉ
मा मनात एकूस विसार येतोतॉ
ओळखीला गा पुता तू आतॅ तरी बयला…
अॅलेक्स मच्याडो.

व्हॅलेंटाईन

अजून सुद्दा त्याव खॉकलो उकालॉ गा
ती येते हळूहळू सलात
हातात पाण्याव तांब्यो घॅअॉन
सलवॅ नाय आतॅ पयल्याहांगडा
वय जाला ताहा
पायाशो पान बेळ्यो जाल्यात आतॅ
त्या पान डॉळ्यात पानी जमातॅ
खॉकॉन खॉकॉन
पानी भरल्या डॉळ्याएस तॉ बगीतॅ तीवर
कोडी धास्ती करतॅ माई
त्या मनात विसार येत्यात
तॉ पान तोडीस धास्ती करतॅ तिई
जरसा आंग तापलान तिनॅ आंगा कॅला गा
यायो हॅजारी सालू आतमिनॅ दापुडॅ
कुनाला तरी धाडॉन सिस्टरला बोलविदॅ
मनात रजार सालूस
देवा इला बरा कर
तीआ पान देवादरी एकूस मांगना
देवा यॅला नीट ठव
मा का हॉये ता होऊं दे
साठ वहरे होआॅन गेले त्या वराडाला
कय फरक पडलॉ नाय दॉगामिनॅ
तिगाळा का….?
घरशा वडलाई हांगीला गा
उबा र्यासा वराडाला
वराड जालान याव संसार सालू जालॉ
वराडाआदी भॅटगाठ नाय
वराड जाल्योर पान बॉल्याशी सोरीस
भरला कुटूंब आन् उगडा घर
कडॅ बॉल्यासा कडॅ भॅट्यासा
तीला हाऊ हर्याव कडाक धाक
भाटामिनॅ हिपना करता करता
दोगायो वारता हॉयाशो तोड्योस
कतॅतरी तॉ घॅआॅन यासॉ मुक्काळीये
भज्याइ पिडी नाक्योरनॅ
दोगे खाशे ते भाटात खपता खपता
ता पान जकला सोरी सोरीस
हळूहळू घर पॉरापाराई भरला
दोगांना आतॅ काम खप्यासा रॅला
दॉपार नाय तिपार नाय
हांज हाकाळ दोगे भाटातूस
हळूहळू पिले भोटे जाले
त्यांना पाखे फुटले
लेकी हार्या निंगॉन गेल्यो
बी पाखरे पान हुरॉन गेले लांब…खूsssब लांब
रेले परत ते दोगेस
असन्या भॉट्या घरात
आतॅ पयल्याहारका बॉलवॅ नाय
दांडी घॅटल्याशिवाय सालवॅ नाय
बेहलेले आहात्यात दोगे आेट्योर
एकमेकाई सोबत करीत….
कतॅ हिंदाळ्यात कतॅ बाकोर
वाट्यात डॉळॅ घालॉनसाठ वहरे आेहॉन गेले त्या वराडाला
तॅनॅ कतॅ तिला हांगीला नाय
तू जाम मस्त सॉबाता
आन् ती सुद्दा कतॅ तॅला बोयली नाय
तू माला आवडाता आहा
तॅनॅ कतॅ तिला खान्याइ पिडी दिली हाडॉन
गुलाबा फूल कतॅ दिला नाय
लांब कडॅ तॅ नायूस
दर्या काठोर पान तिला कतॅ निला नाय
आॅड्या वहरामिनॅ त्या मनातनॅ
तीआॅ विसार कतॅ गॅलो नाय
आन तॅला हॉडोन ती मनामिनॅ
कत्तॅस कुन आल नाय…..व्हॅलेंटाईन कुन, कडसॉ
त्यांना कईस माइत नाय
तरीपान……
रोज हांशापरा तेस करता करता
एकूस रजार सालू आहातॅ दॉगा मनात
देवा,
न्यासा तिगाळा आमाला दॉगांला हस्सालूस ने
कुनाला मांगॅ ठॅावो नाका
कुनाला पुडॅ नॅव नाका…आमेन….अॅलेक्स मच्याडो.

Optimized mobile site